निधन वार्ता

खंडकरी चळवळीतील निस्वार्थ कार्यकर्ते कॉ. रामदास पाटील बांद्रे कालवश

श्रीरामपूरखंडकरी चळवळीत निस्वार्थपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते कॉ. रामदास पाटील बांद्रे यांचे दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे राहत्या घरी वार्धक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी 11:45 वाा. हरेगाव तालुका श्रीरामपूर येथे करण्यात आला.

खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून कॉ. बांद्रे यांनी 1952 साली माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मा.आण्णासाहेब पा.थोरात यांच्या साथीने खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ उभी केली व ती संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिली. त्यांनी जीवनात सतत संघर्ष करित शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून दिल्या. स्वतः ची एक गुंठाही जमीन नसताना, आयुष्यभर ते खंडकऱ्यांसाठी लढत राहिले. त्यामुळे त्यांच्या योगदानाला तोड नाही. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेतकरी वर्गाची व कम्युनिस्ट चळवळीची खूप मोठी हानी झालेली आहे.

Related Articles

Back to top button