कृषी

क्रांतीसेनेचा शेतकऱ्यांसह कृषि कार्यालयावर आंदोलनाचा इशारा

राहुरी : कांदा बियाण्यात फसवणूक झालेल्या कंपनीचा परवाना रद्द करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

“कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्राप्त झालेल्या अहवालात लाल कांदा ऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याचे आवश्यकता आसताना अहवालाच्या पहिल्या पानावर कांदा बियाणे उगवन न झाल्याचे अहवालात दर्शविण्यात आले आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.”

 
   तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी नितीन खांदे,रोहित शेटे,केंदळ बुद्रुक येथील शामसुंदर तारडे या शेतकऱ्यांच्या शेतात लाल कांदा ऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याने बियाणे फसवणूक झाल्याच्या तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी,राहुरी कार्यालयाकडे सादर केला होता.त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त झालेल्या अहवालात लाल कांदा ऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याचे आवश्यकता आसताना पाहिल्या पानावर कांदा बियाणे उगवण न झाल्याचे अहवालात दर्शविण्यात आल्याने संबंधित विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळले आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क व पत्र व्यवहार करुन देखील या प्रकरणाला संबंधित अधिकाऱ्यांकडुन न्याय मिळाला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व कंपनीचे परवाने रद्द करावे,असे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. संबंधित विभागाने शेतकर्यांना न्याय मिळवुन न दिल्यास राहुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय,येथे शेतकऱ्यांसह क्रांतीसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button