औरंगाबाद

विद्यार्थ्यांनी चांगले वाचन कौशल्य आत्मसात करावे -प्रा. संदीप सातोनकर

विजय चिडे/ पाचोड : विद्यार्थ्यांनी  विद्यार्थीदशेत फक्त अध्ययन म्हणजे अभ्यास हा महत्त्वाचा नसून त्याबरोबर अधिक माहितीसाठी ग्रंथालयातील अवांतर पुस्तकांचे वाचन करणे तसेच सतत वाचन क्रिया अंगी बाळगणे हे महत्त्वाचे आहे असे, मत मानसशास्त्राचे प्रा. संदीप सातोनकर यांनी व्यक्त केले. 

शिवछत्रपती महाविद्यालय आय. क्यू ए. सी. अंतर्गत ग्रंथालय विभाग आयोजित स्वर्गीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य कसे विकसित करावे. याबाबत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संदीप सातोनकर बोलत होते. पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी हा सर्वांगीण दृष्ट्या सक्षम असतो परंतु त्याने व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी दररोजचे वाचन व अभ्यास याची जोड दिली तर आयुष्यात तो निश्चितच यशस्वी होऊ शकतो. कार्यशाळा शाळा विषयांमध्ये त्यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी कोणते वाचन साहित्य वाचावे ? वाचन कसे करावे? का करावे ? कधी करावे ? याविषयी सविस्तर माहिती या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिली. दीड वर्षानंतर 20 ऑक्टोबर 2021 बुधवार या दिवशी महाविद्यालय सुरू झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य डॉ सु. मा. नलावडे प्रमुख पाहुणे संदीप सातोनकर, डॉ. गांधी बाणायत व आयोजक डॉ. ह. सो. बिडवे समन्वयक शिवाजी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय समारोपात प्रा. गांधी बानायत यांनी ग्रंथालयातील साहित्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी डॉ. विलास महाजन, डॉ.सुभाष पोटभरे, डॉ.विठ्ठल देखणे, प्रा. तुकाराम गावंडे, प्रा. सचिन कदम, प्रा. उत्तम जाधव, प्रा. संतोष चव्हाण, प्रा.भगवान जायभाय, सतीश वाघ, अनिल नरवडे, गजानन इंगळे, मुरलीधर जीने, गवारे, थोरे, भोसले यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button