सामाजिक

कोविड सेंटरचे उद्घाटन

व्हिडिओमानोरीत कोविड सेंटरचे उद्घाटन

आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढावराहुरी तालुक्यातील मानोरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन प्रांतधिकारी दयानंद जगताप व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आब्बासभाई शेख हे होते.


    जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू केलेल्या कोविड सेंटरची क्षमता २० बेड असुन पिण्याच्या पाण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, उत्तमराव खुळे, डॉ.अजिंक्य आढाव, डॉ.दत्तात्रय माने, शिवाजी थोरात, अण्णासाहेब तोडमल, श्यामराव आढाव, मनोज आढाव, दिलावर पठाण, चांगदेव आढाव, अण्णासाहेब ठुबे, के.बी.शेख, चंद्रभान आढाव, निवृत्ती आढाव, डॉ महेश आढाव, डॉ दिनेश जाधव, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर कामगार तलाठी राहुल क-हाड, प्रविण जाधव, पोलीस पाटील भाऊराव आढाव, गोरक्षनाथ गुंड, अविनाश आढाव, आरोग्य विभागाचे कर्मचारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. बाबा आढाव यांनी केले.

Related Articles

Back to top button