कृषी

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन


राहुरी विद्यापीठ / जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक विजय कोते व विद्यापीठातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

     महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी संकेतस्थळाच्या उपयुक्ततेविषयी माहिती देऊन संकेतस्थळाचा फायदा सर्व विद्यार्थी, पालक व शेतकर्यांना कसा मोठ्या प्रमाणात होईल हे सांगितले. कुलगुरु डॉ. पाटील यांनी संकेतस्थळाच्या उद्देशाबाबत समाधान व्यक्त करुन संकेतस्थळाचा वापर सर्वांनी करणेबाबत सूचित केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संकेतस्थळ तयार करण्यासाठी डॉ. गोविंद येनगे व डॉ. अवधूत वाळुंज यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button