राजकीय
कोणाच्या गळ्यात पडणार अध्यक्षपदाची माळ
आरडगांव (प्रतिनिधी) राजेंद्र आढाव : मुसळवाडीसह ९ प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आनेकांनी फिल्डिंग लावल्या आहेत.राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणारी मुसळवाडीसह ९ प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदाची निवड सोमवार दि. 28 जुन रोजी राहुरी पंचायत समितीच्या स्व. डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. हि निवड लोकशाही पध्दतीने न करता दबावतंत्राचा वापर केला तर बनावट प्रतिनिधी हजर करून प्रोसिंटगवर खोट्या सह्या करत गुप्त पध्दतीने मतदानचा आग्रह धरला असे आरोप प्रत्यारोप झाल्याने काही काळ गोंधळ होऊन हि निवड रद्द करण्यात आली होती. पुन्हा या ठिकाणी शुक्रवार दि. 23 जुलै रोजी मुसळवाडी- अमृत धुमाळ,सारिका घोलप,मांलुजे खर्द- डॉ सर्जेराव सोळुंके,सुभाष पवार,माहेगांव- सौ.शारदा आढाव,वाल्मिक गायकवाड,खुडसरगांव- बबाबाई माळी,रामेश्वर पवार,पाथरे- निता घारकर,श्रीकांत जाधव,कोपरे- कविता जाधव,द्वारकानाथ जाधव,वांजुळपोई- सविता कोळपे,शिवाजी पवार,तिळापुर- सुधाकर पवार,बापु आघाव या सदस्या मधून अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
“मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ,मांलुजा खुर्द सरपंच डॉ सर्जेराव सोळुंके या दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरू असुन या दोघांमधुन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”
“मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ,मांलुजा खुर्द सरपंच डॉ सर्जेराव सोळुंके या दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरू असुन या दोघांमधुन अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”