ठळक बातम्या

कोकणात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत करा-माजी मंत्री बावनकुळे

कार्यकर्ता आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील

राहुरी फॅक्टरी : देवळाली प्रवरा येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ता आढावा बैठकीत कोकणात मृत पावलेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदत करावी, असे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.देवळाली प्रवरा येथे भारतीय जनता युवा मोर्चाची आढावा बैठक भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी माजी उर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभेच्या २८८ मतदार संघामध्ये प्रत्येक बुथवर पंचवीस युवा वारियर्स जोडण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चाच्या अभियानाद्वारे होणार आहे. राज्यात २५ लाख युवकांचा युवा वारियर्सचे संघटन तयार करण्यात येणार आहे. या युवकांचा राजकारणासाठी वापर करण्यात येणार नाही. तर त्यांना त्यांच्या कलागुणांनुसार आत्मनिर्भर बनविण्यासाठी सगळ्याच तरुणांना नोकऱ्या मिळवून देवू शकत नाही. परंतू ,त्यांचे आवडीचे व्यासपीठ उपलब्ध होवू शकते.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याऐवजी शेतीचे विज कनेक्शन तोडले. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. असे माजीमंत्री बावनकुळे म्हणाले.
      यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम, संकेत बावनकुळे, उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,  माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, शहाजी कदम, पक्षप्रतोद सचिन ढुस, नगरसेवक बाळासाहेब खुरुद, ज्ञानेश्वर वाणी, अमोल कदम, भारत शेटे, सचिन सरोदे, सागर खांदे, चेअरमन राजेंद्र ढुस, व्हाईस चेअरमन सुधीर टिक्कल, सोपानराव शेटे, सोपानराव भांड, भाऊसाहेब गडाख दिगंबर पंडित, दिलीप मुसमाडे मच्छिंद्र कदम भीमराज मुसमाडे सचिन सरोदे आदी सह सर्व नगरसेवक, संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भाजपाचा देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अजित बाजीराव चव्हाण यांची राहुरी फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर) शहर अध्यक्ष पदी वसंतराव कुंडलीक कदम युवा मोर्चा देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी डॉक्टर अजिंक्य सूर्यकांत कदम, युवा वारियर्स देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी रविकिरण विजय ढुस, राहुरी फॅक्टरी (श्रीशिवाजीनगर) शाखा अध्यक्षपदी यश सुधाकर आदिक तसेच तालुका प्रसिद्धी सल्लागार पदी पत्रकार चेतन कदम यांची निवड करून त्यांना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विक्रांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

नगरपरिषदेची सत्ता पुन्हा काबीज करा : 
” गेल्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षांसह १८ पैकी १६ नगरसेवक उच्चांकी मताधिक्क्याने निवडून आले होते चार महिन्यावर नगर परिषदेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा निवडून आणा व सत्यजित कदम यांना साथ द्या असे आव्हान माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले यावेळी सर्वांनी हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला.”

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button