शिक्षणवारी ज्ञान पंढरी

कोंढवड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हिवाळे यांची निवड

राहुरी : तालुक्यातील मॉडेल स्कुल गौरव असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवड येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे पुर्नगठन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील हिवाळे यांची तर उपाध्यक्षपदी रोहिणी राजेंद्र म्हसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी कोंढवडचे लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी म्हसे, नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष साहेबराव म्हसे, माजी उपसरपंच युवानेते इंद्रभान एकनाथ म्हसे, संभाजी पेरणे, उपसरपंच दिलीप म्हसे, चंद्रकांत म्हसे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी औटी, ज्ञानेश्वर म्हसे, बंटी म्हसे, शरदचंद्र म्हसे, अर्जुन म्हसे, बंडु म्हसे, राजेंद्र म्हसे, सुनिल परदेशी, पोपट औटी, भाऊसाहेब म्हसे, ग्रामसेवक शिवाजी पल्हारे, उज्वला पिसाळ, सोनाली पिसाळ, ज्योती म्हसे, कविता नवले, विद्यार्थी प्रतिनिधी आरती म्हसे, वैष्णव जरे, शिक्षक प्रतिनिधी बाळकृष्ण देवरे, अनिता पाले, मुख्याध्यापिका सरस्वती खराडे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवडीचे मुंबई म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ योगेश म्हसे साहेब यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी म्हसे यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button