कृषी

कोंढवड येथील शेतकऱ्यांना कृषिदुत चव्हाणने केले मार्गदर्शन

राहुरी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाट येथील विद्यार्थी अभिषेक सीताराम चव्हाण याने कोंढवड येथे ग्रामिण कृषि जागरूता व कृषि औद्योगीक सलग्नता कार्यक्रमांतर्गत शेतकरयांना वाळलेला चारा तयार करण्याचे प्रात्यक्षित दाखवून मार्गदर्शन केले.

कोंढवड परिसरातील शेतकरी व त्यांच्याकडे असलेल्या जनावरांचा अभ्यास केला व शेतकरी वर्गाच्या समस्या जाणुन घेतल्या. कृषिदुत अभिषेक चव्हाण याला शेतकरी वर्गाच्या दुध उत्पादनात घट दिसून आली. दिवसेंदिवस जनवरांना योग्य चारा मिळत नसल्याने दुध उत्पादनात घट येत आहे, असे निदर्शनास आले. दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी वाळलेला चारा प्रक्रिया बाय युरिया या पद्धतीचा चारा अतिशय उत्तम आहे, असे कृषिदुत चव्हाण यांनी शेतकरी वर्गाला सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी शंकर म्हसे, सचिन म्हसे, दत्तु हरिश्चंद्रे, काकासाहेब म्हसे, चंद्रकला म्हसे, लताबाई म्हसे आदी उपस्थित होते. 

या उपक्रमाला प्राचार्य डॉ. एम.बी धोंडे, उपप्राचार्य डॉ. एच. एल शिरसाठ, प्रा. डॉ. व्हि.एस निकम, प्रा. एस.बी राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस. के दांगडे, प्रा. पी. आर हसनाळे, प्रा. किशोर मोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button