सामाजिक
कोंढवडच्या जिल्हा परिषद शाळेला बी द चेंज संस्थेकडून टॅब भेट
राहुरी प्रतिनिधी : शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण अवगत होण्यासाठी तालुक्यातील कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बी द चेंज या महाराष्ट्रातील नामांकित संस्थेचे अध्यक्ष आदित्य म्हसे यांनी सॅमसंग कंपनीचा टॅब भेट दिला आहे.
यावेळी आदित्य म्हसे यांचा कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील हिवाळे तसेच ज्येष्ठ नेते तथा स्वामी विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, रुक्मिणीकांत म्हसे, दिलीप म्हसे आदींनी सत्कार केला.
आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये शिक्षण घेताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान लहानपणापासून रुजावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच कोंढवड शाळेला भविष्यकाळात संस्थेच्यावतीने मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष आदित्य म्हसे यांनी दिली. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी उपसरपंच दिलीपराव म्हसे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हसे, मधुकर म्हसे, अनिल म्हसे, अर्जुन म्हसे, अथर्व म्हसे, आर्यन म्हसे, ओंकार म्हसे, राजू पेरणे, दशरथ म्हसे, नितीन म्हसे, नरेंद्र म्हसे, महेश शेजवळ, विजय कदम, भागवत पुंड, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.