अहमदनगर

केंदळ खुर्द येथे ई पीक पहाणी व मोफत सातबारा उतारे वाटप

केंदळ खुर्द येथे सरपंच मंदाकिनी मच्छिंद्र आढाव, उपसरपंच बाळासाहेब आढाव, राजेंद्र आढाव आदी मोफत सातबारा उतारेचे वाटप करताना…


आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढावमहसुल विभागाच्या ई पीक पहाणी व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध योजनांची माहिती देत मोफत सातबारा उतारेचे वाटप करण्यात आले आहे.


राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द येथे सरपंच मंदाकिनी मच्छिंद्र आढाव, उपसरपंच बाळासाहेब आढाव, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र आढाव यांच्या हस्ते मोफत सातबारा उतारेचे वाटप करण्यात आले व महसुल विभागाच्या मार्फत ई पीक पहाणी तसेच विविध योजनांची माहिती तलाठी राहुल कराड यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी पोलीस पाटील प्रल्हाद तारडे, कोतवाल सखाहरी इंगळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button