अहमदनगर

कृषी विद्यापीठाच्या ‘फुले जल’ ला परवाना नसल्याचे निष्पन्न, बाळासाहेब जाधव यांची तक्रार

चिंचोली / बाळकृष्ण भोसले : एकीकडे राहुरी तालुक्यात पिण्याच्या दुषित पाण्याचा सुकाळ होऊन घातक आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्‍वभुमीवर शेतकर्‍यांची कृषी पंढरी असलेल्या व संशोधनातून सकस बियाण्यांची निमिर्तीचा वाहवा करणार्‍या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले जल विनापरवाना आणि आयएसआय मार्क व एफएसएसएआय लायसन्स, भारतीय मानंक ब्युरो यांचा परवाना नसल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी याबाबत फुलेजलचा पर्दाफाश करून अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्र.बा. कुटे यांचेकडे तक्रार केली होती. त्यावरून तक्रारीची दखल घेत संबंधित कार्यालयाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आंतरविद्या शाखा जलसिंचन विभाग यांच्या पेढीची तपासणी केली असता विनापरवाना विक्री केल्याचे आढळून आले आहे. त्यावरुन कुटे यांनी उत्पादन व विक्री करण्यास विनापरवाना व्यवसाय केल्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
दरम्यान जाधव यानी केलेल्या तक्रारीत म्हटले, सन २०१८ ते २०२१ असे सलग चार वर्ष या पाण्याची बेकायदा, विनापरवाना विक्री करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे संबंधित आंतरविदया शाखा जलसिंचन विभागाचे अधिकारी नंदकुमार माने हे संपूर्ण कार्यालय व परिसरातील कुटुंबाला पाणीपुरवठा करीत होते. विद्यापीठाच्या संपूर्ण कार्यालयीन विभागात अधिकारी व कर्मचारी यांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन विद्यापीठ प्रशासनाने वॉटर फिल्टर बसविले आहेत. मात्र आता हा खर्च पाण्यात गेला आहे. तर संबंधित अधिकारी माने हे बाहेरील हॉटेलसाठी फुलेजलचा पुरवठा करीत असल्याचे जाधव यांनी तक्रारी म्हटले आहे. यातुन दिवसाकाठी १५ ते २० हजार रुपयांचा व्यवसाय खुलेआम सुरु होता एक्सपायरी डेट न टाकता व संबंधित कार्यालयाची परवानगी न घेता शासकिय नियमाची पायमल्ली करून केलेली फुले जल विक्री आता वादाच्या व कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या विद्यापीठाची फसवणुक करणार्‍या संबंधित विभाग व नंदकुमार माने या अधिकार्‍यावर अन्न व सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी बाळासाहेब जाधव यानी अन्न सुरक्षा अधिकार्‍याकडे केली आहे.

Related Articles

Back to top button