कृषी

कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांद्वारे शेतकरी विकसित यंत्रे व अवजारांची पाहणी व मार्गदर्शन

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : देवरपाडा, मालेगाव, जि. नाशिक येथील प्रगतशील शेतकरी कमलेश घुमरे यांनी टाकाऊ आणि भंगार वस्तू पासून शेतकर्यांना उपयोगी असणारे व कष्ट कमी करणारे यंत्रे व अवजारांची निर्मिती केली आहे. कमलेश घुमरे यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांनी विकसित केलेल्या यंत्रे व अवजारांची पाहणी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषि यंत्रे आणि शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे, कृषि अवजारे व यंत्र योजनेचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड आणि काष्टी, मालेगाव कृषि विज्ञान संकुलाचे प्रकल्प समन्वयक डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी कमलेश घुमरे यांच्या शेतात जाऊन त्यांनी तयार केलेल्या अवजारांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. त्यांच्या शंकांचे निरसन करुन त्या संबंधित तांत्रिक मार्गदर्शन केले. कमलेश घुमरे यांनी टाकाऊ वस्तूंपासून फवारणीसाठीची ढकलगाडी, शेवगा झेला, टोकन यंत्र आणि ट्रॅक्टरची केबिन तयार केली आहे.
शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारचे प्रयोग करतात, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे संशोधन इतरांना उपयुक्त ठरेल. सर्वोत्तम शेतकरी तंत्रज्ञान विकसित होण्याच्या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार यांच्या पुढाकाराने कृषि अभियांत्रिकी विद्या शाखेने या वर्षापासून शेतकरी तंत्रज्ञान स्पर्धा आयोजित करण्याचा ठरावही संमत केला आहे. सदर स्पर्धा शेतकरी संशोधकांसाठी त्यांचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याचे एक उत्तम व्यासपीठ ठरेल आणि काही सर्वोत्तम तंत्रज्ञानास पारितोषिकाबरोबरच सदर तंत्रज्ञानाचा विकास करून त्यांना उद्योजकता विकसित करणेसाठी कृषि विद्यापीठामार्फत मदत केली जाईल.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button