अहमदनगर
कृषिदूत शंकरानंद भालेराव यांचे वरवंडीत स्वागत
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, कृषी महाविद्यालय सोनई, येथील विद्यार्थी शंकरानंद बाळू भालेराव ह्याने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२०२२ अंतर्गत राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन दिले.
यावेळी गावात त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी वरवंडी गावचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, ग्रामसेवक श्रीमती जाधव मॅडम, पप्पू भालेराव, ग्रामपंचायत सदस्य आबा भालेराव व इतर गावकरी उपस्थित होते.
ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरी मोरे, कार्यक्रम समन्वयक प्रा.अनूप दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र लिपणे यांचे मार्गदर्शन लाभले.