अहमदनगर

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची निष्पक्ष चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी- भाऊसाहेब पगारे

चिंचोली/ बाळकृष्ण भोसले : अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेली आग ही खुप ह्रदयद्रावक व दुर्दैवी घटना आहे. या आगीत अकरा रुग्णांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला आहे  मृत्यु झालेल्यांच्या नातेवाईकांना शासनाने भरीव प्रमाणात आर्थिक मदत करावी. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून आग प्रतिबंधक सुरक्षा तपासणी केलेली आहे की नाही याची तपासणी करण्याची  मागणी आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे.

भाऊसाहेब पगारे यांनी प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल चौकशी करुन जिल्हा शल्य चिकित्सक सह  दोषी असणारे अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करुन त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून फायर ऑडिट केले आहे की नाही हे ही पूर्णपणे तपासावे. तसेच घटनेची निष्पक्ष चौकशी करुन घटनेत मृत्यू पावलेल्या निष्पापांना न्याय देण्याची मागणी पत्रकात करण्यात आली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button