अहमदनगर

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाईजेशनच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी शौकतभाई शेख

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : तळागळातील उपेक्षित सामाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभर कार्यरत असलेल्या ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाइजेशनच्या अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी येथील ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तसेच उत्तर जिल्हा सचिवपदी शाहिद खान आणि सहसचिवपदी शकील अहमद शेख यांची निवड करण्यात आली.
ऑर्गनाईझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी यांच्या आदेशानुसार सदरील निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज बागबान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. येथील समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटच्या मिटिंग हॉलमध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी ऑर्गनाईझेशनचे जिल्हा संघटक जाकीर शाह, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई तांबोळी, ॲड. मोहसीन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी आपल्या प्रस्ताविकात बोलताना ऑर्गनाईझेशनचे जिल्हा संघटक जाकिर शाह म्हणाले की, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ही राष्ट्रीय स्तरावरील मोठी संस्था असून राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या माध्यमातून अनेक राज्य आणि जिल्हा व तालुकास्तरावर उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची कामे गत अनेक वर्षांपासून केले जात आहे. यामुळे ओबीसींसह सर्वच उपेक्षित समाज घटकांनी, विविध सामाजिक संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने या संस्थेत सहभागी होत आपले हक्क अधिकार प्राप्त करण्यासाठी पुढे यावे आणि या राष्ट्रीय संस्थेशी जुडावे असेही ते म्हणाले.
तसेच मुश्ताकभाई तांबोळी यावेळी बोलताना म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला जी घटना दिली आहे, त्यात सर्वच उपेक्षित घटकांना योग्य न्याय आणि अधिकार बहाल केला आहे. जगाच्या पाठिवर आपला एकमेव देश असा आहे की, या देशात अनेक जाती-धर्माचे लोकं मोठ्या गुण्या गोविंदाने राहतात. हे केवळ आपल्या राज्यघटनेमुळेच प्रत्येकाला आपापला अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून एकत्र येत आपला हक्क आणि अधिकार प्रत्येकाने जाणून घेत मुख्य प्रवाहात सामिल होण्याचा जरुर प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
याप्रसंगी ॲड. मोहसिन शेख म्हणाले की, अनेक दिवसांपासून मी बघतो आहे, ओबीसी ऑर्गनायझेशनचे कार्य खुपच चांगले आणि सुंदर आहे, ज्या ज्या वेळी आवश्यक्ता भासेल त्या त्या वेळी मी संस्थेचे सदस्य, पदाधिकाऱ्यांना उपेक्षित जनसामान्यांची कामे करताना शासन दरबारी येणाऱ्या विविध आडी – आडचणींबाबत योग्य मार्गदर्शन करेल तथा उपेक्षित घटकांच्या योग्य न्याय हक्कांसाठी वेळ प्रसंगी शासनाशी भांडण्याचीही आपली तयारी असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी शौकतभाई शेख म्हणाले की, ऑर्गनाईझेशनने खरोखरच ही मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, मी विश्वासपूर्ण ही जबाबदारी पार पाडेल अशी ग्वाही याप्रसंगी देत त्यांनी ऑर्गनाईझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अन्सारी, जिल्हाध्यक्ष बागवान, उपाध्यक्ष काकर आणि पदाधिकाऱ्यांचे अभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक झाकीर शाह तर सूत्र संचालन उपाध्यक्ष इकबाल इस्माईल काकर (सर) यांनी केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी, जिल्हा सहसचिव अजीजभाई आत्तार, साबीर शाह (सर) सरताज शेख, अब्दुल हमीद शाह, रियाज अन्सारी, राजू कुरेशी आदी उपस्थित होते. शेवटी जिल्हाध्यक्ष हाजी फय्याजभाई बागवान यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button