साहित्य व संस्कृती

नव्या पिढीने मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री करावी – उन्हाळे

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडेआजची युवापिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे, परंतु त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. ज्ञानसंपन्नता वाढवणे गरजेचे आहे पण वाचनातून वाढेल. आपलं आरोग्य आणि ज्ञानसंपन्नता वाढविण्यासाठी मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री करावी अशी अपेक्षा कुंभार समाज संघटनेचे नेते नंदकुमार उन्हाळे यांनी व्यक्त केली.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे वाचन संस्कृती “वाचन एक संस्कार उपक्रम “अंतर्गत पुस्तक चर्चा आणि भेटप्रसंगी नंदकुमार उन्हाळे बोलत होते. यावेळी कडा येथील संघर्षग्रुपचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख, इंजिनिअर ईश्वर देशमुख, प्रसाद देशमुख, बाबा उन्हाळे आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. आज घरोघरी मोबाईल आणि इतर प्रसार माध्यमे वाढली आहेत. शिक्षण ऑनलाईन झाले आहे. मोबाईलमध्ये विविध खेळ यात लहान मुले आणि युवापिढी अतिशय अडकत चालली आहे. या सर्वांचा प्रकृतीवर विशेषतः डोळे, मन यावर परिणाम होत आहे. म्हणून पुस्तकांशी मैत्री उपयुक्त होईल यासाठी उपक्रम सुरु केला आहे.

नंदकुमार उन्हाळे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. बाबा उन्हाळे यांनी आज युवक पुस्तकं वाचत नाहीत, त्यामुळे घरोघरी पुस्तकालय हवे असे सांगितले, सुभाषराव देशमुख यांनी आपण पुस्तकामुळे प्रगती करू शकलो असे सांगितले. ईश्वर उन्हाळे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button