अहमदनगर

ॲड. भागचंद चुडिवाल यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने सन्मानित करून निरपेक्ष सेवेचा आदर्श जपला – डॉ. राजीव शिंदे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर ही आधुनिक नगरी अनेकांच्या योगदानातून आकाराला आली आहे, या शहराचे सेवाभूषण असलेले ॲड. भागचंद चुडिवाल यांच्या ‘नॅब’च्या आणि इतर सेवेभावी कार्याची दखल घेऊन विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने त्यांना सन्मानित करून खऱ्या अर्थाने एका निरपेक्ष सेवेचा आदर्श जपला असल्याचे मत डॉ.राजीव रावसाहेब शिंदे यांनी मत व्यक्त केले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापन दिन आणि सन्मान सोहळा ‘नॅब’ च्या सभागृहात आयोजित केला होता, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. राजीव शिंदे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील, माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधी, स्व. ॲड. रावसाहेब शिंदे आणि स्व सौ.पुष्पाताई सुकळे यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. ‘नॅब’तर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, ती सूचना शाळेच्या शिक्षिका सौ.सुनीता वढणे यांनी मांडली.
स्व. सौ. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अंध शाळेसाठी 31 हजार रुपये देणगी आणि विद्यार्थी भोजनासाठी सहा हजार एकशे रुपये असे देणगी चेक डॉ. राजीव शिंदे यांच्या हस्ते ‘नॅब ‘अध्यक्ष ॲड. भागचंद चुडिवाल आणि संचालकाकडे सुपूर्त करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी करून प्रतिष्ठान कार्य अहवाल सादर केला. स्व. सौ. पुष्पाताई सुकळे यांचे प्रतिष्ठानसाठीचे योगदान विशद केले. ॲड. भागचंद चुडिवाल यांचा मानपत्र, बुके शाल देऊन डॉ. राजीव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.
ॲड. भागचंद चुडिवाल यांनी आपल्या मनोगतातून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून सुखदेव सुकळे यांनी ‘नॅब’साठी भरभरून देणगी दिल्याबद्दल त्यांचे व पदाधिकारी यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. गुरुवर्य ॲड. रावसाहेब शिंदे यांच्यामुळे जीवनाला दिशा मिळाली अशा भावना व्यक्त केल्या. प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी ॲड. भागचंद चुडिवाल यांच्या सेवाभावी कार्याची महती सांगितली. अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून पुढे सांगितले की, हा सत्कार्याचा सत्कार आहे, ॲड. भागचंद चुडिवाल यांचे कार्य उल्लेखनीय आहे, विश्वलक्ष्मी प्रतिष्ठानने त्यांचा उचित सन्मान केल्याबद्दल सुकळेसरांना धन्यवाद दिले. भूमी फौंडेशनतर्फे भीमराज बागुल यांनी ॲड. भागचंद चुडिवाल यांचा सत्कार केला.
सौ. उज्ज्वला बाळासाहेब बुरकुले, सौ. सुरेखा संजय बुरकुले, संकेत बुरकुले, साहेबराव सुकळे, सुबोध बुरकुले, सौ. सुनीता वढणे, अंध शाळेच्या शिक्षक, शिक्षिका, सेववकवर्ग यांनी नियोजनात भाग घेतला. शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी सुंदर आवाजात स्वागत गीते सादर केली. ॲड. रंगराव गुजर, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार पद्माकर शिंपी, माजी तहसीलदार गुलाबराव पादिर, काशिनाथ गोराणे, श्रीयुत राठी, श्रीयुत ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button