राजकीय

रिपब्लिकन पाटी ऑफ इंडीया आठवले गट निवडणुका स्वबळावर लढविणार-सुरेंद्र थोरात

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आगामी होऊ घातलेल्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची माहिती सुरेंद्र थोरात यांनी राहुरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी माहिती देताना सांगितले की केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आरपीआय जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन स्वबळावर लढवणार आहोत.
केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आमची युती आहे परंतु राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला सन्मान पूर्ण जागा न मिळाल्यास आम्ही या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत असे ना. रामदास आठवले यांचे स्पष्ट आदेश आलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून अहमदनगर उत्तर जिल्ह्यामध्ये आम्हाला मित्र पक्षाने विश्वासात घेऊन सन्मान पुर्वक जागा दिल्या तरच आम्ही युती करणार आहोत अन्यथा आरपीआयच्या वतीने स्वबळावर पुर्ण ताकदीने आगामी निवडणुकीत उतरणार आहोत.
यावेळी राहुरीचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, शहर अध्यक्ष सचिन साळवे, माजी नगरसेवक अरूण साळवे, बाबा साठे, सुरेश चांदणे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विलास साळवे सविस्तर माहिती देताना म्हणाले की उत्तर नगर व राहुरी नगर पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत लोक हितासाठी सक्षम पर्याय देणार आहोत. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी यांनी जी आश्वासने दिली होती. त्यातील एक हि आश्वासनांची पुर्तता पुर्ण पाच वर्षात केलेली दिसुन येत नाही. मग तो प्रश्न शासकीय रुग्णालयाच्या ईमारतीचा असो किंवा दलित आदिवासी समाजाच्या दफनभुमीचा असो. वाढिव पाणीपट्टी व घरपट्टी अशा अनेक प्रश्नाकडे सत्ताधारी व विरोधी पक्षनेते यांनी सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर गप्प बसण्याची भुमिका घेतली. फक्त आणि फक्त आपले पंटर ठेकेदारिच्या माध्यमातून पोसण्याचे काम केले. सत्ताधारी कोण आणि विरोधी कोण हेच जनतेला माहिती नाही. मग हे काय विकास करु शकतात. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी सक्षम पर्याय देणार आहोत. यासाठी जनतेने देखील भक्कमपणे आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असे आवाहनही विलास साळवे यांनी केले आहे. एका वरिष्ठ पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला असता सुरेंद्र थोरात यांनी सुचकपणे उत्तर देत सांगितले की कोणत्याही सत्ताधारी यांच्या दावनीला आम्ही बांधलो जाणार नाही. एवढाच विश्वास आमच्यावर या निवडणुकीच्या निमित्ताने ठेवा व सर्वांचे आभार हि सुरेंद्र थोरात यांनी मानले. यावेळी शहर व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button