महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र संघटकपदी पवार

जळगाव : येथील प्रदीप पवार यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटकपदी निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी प्रदीप पवार यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. प्रदीप पवार यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची उत्तर महाराष्ट्र संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री शालिनीताई पाटील,पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय तांबे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नंदलाल वसईकर,खान्देश प्रमुख संदीप सोनवणे, जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत चौधरी आदींनी अभिनंदन केले आहे.प्रदीप पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button