महाराष्ट्र

ई-पीक पाहणी कार्यक्रमाचा शुभारंभ

महसूल व कृषी विभागातर्फे स्वातंत्र्य दिनापासून ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कृषी मंत्री दादासाहेब भुसे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महसूल अप्पर सचिव डाॅ.नितीन करीर, कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, जमावबंदी आयुक्त निरंजन सुधांशू, टाटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहम आदिंसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button