औरंगाबाद
ईसारवाडी येथे विशाखा समिती सदस्यांचा सत्कार
विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत स्थापन करण्यात आलेल्या विशाखा समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश लोखंडे यांनी महिला तक्रार निवारण समिती चे महत्त्व व विशाखा समितीचे कार्य या विषयी मार्गदर्शन केले.
सरपंच योगेश सोनवणे, सदस्य सुनील बोबडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ रांजणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी विशाखा समिती अध्यक्षा श्रीमती सुनीता गोंधळे, उपाध्यक्षा वनिता वावधने, सचिव वैशाली धोत्रे, सदस्या सुलभा झिरपे, मीरा पाटील, ज्योती बोबडे, विजया दले, सुभद्रा पुंड या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी किरण खडके, सिद्धार्थ वाघ, संध्या गित्ते, रेखा बेळगे, सुषमा गोंडगे, प्रणिता दाणी, सारिका लवटे सह आदी उपस्थित होते.