महाराष्ट्र

इपीएस ९५ पेन्शनर्सचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : खा.हेमा मालिनी यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत व शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इपीएस ९५ पेन्शनराचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली.
    पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट आश्वासन दिले की मागणी रास्त असून ती लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.मधल्या काळात इतर अडचणीमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला.पण आता लवकरच कार्यवाही होईल. त्यानंतर पंतप्रधानांच्या सूचनेनुसार पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे स्वत: खा.हेमा मालिनी व शिष्टमंडळातील सदस्यांना घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली. त्यांना प्रश्न मार्गी लावण्याचा आग्रह केला.राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राउत यांनी अर्थमंत्र्यांना इतर पेन्शनसाठी सरकार पूर्ण योगदान करीत आहे मग याच पेंशनरांसाठी काहीच का नाही? असा प्रश्न उपस्थित करून सरकारने तातडीने आर्थिक तरतूद करण्याची विनंती केली. शिष्टमंडळाने अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची भेट घेऊन या प्रश्नावर लवकर कार्यवाही करण्याची विनंती केली.आज भेटलेल्या शिष्टमंडळात कमांडर अशोकराव राउत यांच्या समवेत राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी विरेन्द्र्सिंग राजावत व राष्ट्रीय सल्लागार पी एन पाटील हे होते.अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी दिली.

Related Articles

Back to top button