महाराष्ट्र

इगतपुरी येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची बैठक संपन्न

सिन्नर प्रतिनिधी तालुक्यातील पांढुर्ली घोटी इगतपुरी येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा बोरसे हे होत्या.या बैठकीत शासनाने घरकुल योजनेसाठी पाच लाख रुपये द्यावे, वन जमिनीवर आदिवासींना हक्क मिळाला पाहिजे, आदिवासी परिसरात वस्तीगृह निर्माण करून द्यावे, रेशन कार्ड बंद असेल किंवा धान्य भेटत नाही याबाबत लवकरच पाठपुरवठा करून रेशन कार्ड चालू करणे,आदी विषयावर चर्चा करण्यात आली आहे.

  

   या प्रसंगी एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे संस्थापक रेवनाथ जाधव, महासचिव राहुल आहिरे, राज्य संपर्क प्रमुख तुषार आहिरे, नाशिक जिल्हा संघटक चंद्रशेखर रोकडे,जिल्हाध्यक्ष अशोक नाईक,सिन्नर तालुका रामदास बर्डे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार,सिन्नर तालुका कार्याध्यक्ष विजय पिंपळे, सिन्नर शहर अध्यक्ष सुदाम तांबे,प्रमोद पवार,ग्रामपंचायत सदस्य राजाराम गांगुर्डे, रतन मोरे, निवृत्ती गांगुर्डे, भिका माळी, त्रिंबक सोनूसे, भरत मोरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, दीपक गांगुर्डे ,सुनील जाधव, गंगुबाई मेंगाळ, आदी उपस्थितीत होते.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button