निधन वार्ता
आसाराम पाचे यांचे निधन
विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील जेष्ठ नागरीक आसाराम भगवान पाचे (वय ७४) यांचे दि.३ नोव्हेंबर बुधवारी रोजी सायंकाळी चार वाजेदरम्यान ढाकेफळ येथील राहत्याघरी अल्पशा आजाराने निधन झाले.
घरची गरीब परीस्थिती व स्वत:च्या शारीरीक अपंगत्वावर मात करुन मोठ्या जिद्दीने जुन्या काळात शिक्षण घेऊन पाठबंधारे खात्यात नोकरी करुन ते सेवा निवृत्त झाले होते. आपल्या मनमिळाऊ, संयमी स्वभावाने ते ढाकेफळ पंचक्रोशीतील सर्वांचे आवडते होते. ढाकेफळ येथील यळगंगा नदीच्या तिरावर बुधवारी रात्री आठ वाजेदरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, पुतने असा मोठा पाचे परीवार आहे.सुनिल पाचे, अनिल पाचे यांचे ते वडील होत.