अहमदनगर

आरोग्य भरतीच्या परिक्षार्थींना नुकसान भरपाई द्या : म्हसे

राहुरी/मधुकर म्हसे : आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे भाजपाचे शरद म्हसे यांनी केली आहे.


म्हसे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाची भरती रद्द झाल्याचे २४ सप्टेंबर २०२१ म्हणजेच परीक्षेच्या एक दिवस अगोदर परीक्षा रद्द करण्यात आल्याचे उमेदवारांना कळविण्यात येत आहे. असे अचानकपणे, तात्काळ परीक्षा रद्द करून आज लाखों विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे नुकसान केले आहे. याच बरोबर बरेच परीक्षार्थी हे परीक्षा केंद्राच्या वाटेवर आहेत तर काही परीक्षा केंद्राच्या बाहेर झोपून रात्र काढत आहेत.

उद्याच्या सोनेरी भविष्याचा वेध घेताना प्रसंगी आज लाखों तरुण उपाशी मिळेल तिथे झोपून रात्र काढत आहे. एकीकडे भीषण बेरोजगारीचे सावट तर दुसरीकडे असे अचानक धडकलेले सुलतानी संकट यामुळे परीक्षार्थी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक तणावात जाणार आहेत. या तनावाचे रूपांतर अतिशय भयानक होणार आहेत. या प्रकाराबद्दल माफी दिलगिरी मागू नका पण परीक्षेला बसणाऱ्या ८ लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाचा, राहण्याचा व इतर खर्च म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात यावेत. तसेच सरकारने न्यासा नावाच्या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट दिल होत, त्यांच्याकडून ही वसुली केली जावी.

Related Articles

Back to top button