क्रीडा

आप्पासाहेब ढूस व गीताताई विखे पाटील यांची इंडिया बुक मध्ये नोंद..!

नवी दिल्ली – दि. 06 जून 2020
   देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री आप्पासाहेब ढूस व लोणी येथील गृहिणी सौ. गीता विजय विखे पाटील यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. 
      पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची नात सून तथा माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे लहान बंधू भाऊसाहेब विखे पाटील यांच्या सूनबाई तसेच अहमदनगर चे माजी खासदार कै.  पंढरीनाथ रामचंद्र कानवडे पाटील यांची नात आणि देवळाली प्रवरा येथील तत्कालीन प्रतिष्ठीत डॉक्टर कै. लक्ष्मण पंढरीनाथ कानवडे यांच्या सौ. गीता विजय विखे पाटील या द्वितीय कन्या आहेत. 
     अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवासी तथा महाराष्ट्र शासनाच्या शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस यांचे सोबत पॅरामोटर मध्ये बसून सौ. गीता विजय विखे पाटील यांनी 02 एप्रिल 2020 रोजी राहुरी एम.आय.डी.सी. परिसरात सकाळी 7.30 वाजता तब्बल दोन हजार फूट उंचीवर केक कापून वाढदिवस साजरा केला. 
    अश्या पदधतीने एखाद्या महिलेने पॅरामोटर मध्ये बसून हवेत तब्बल दोन हजार फुटांवर उड्डाण घेवुन वाढदिवस साजरा करण्यात आल्याची ही देशातील पहिलीच घटना ठरल्याने त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेऊन नोंद केली आहे.तसेच आप्पासाहेब ढूस यांच्या हवेतील साहसी क्रीडा प्रकाराच्या कारकिर्दीतील हा नववा राष्ट्रीय  विक्रम ठरला आहे.आप्पासाहेब ढूस व सौ. गीता विखे पाटील यांची इंडिया बुक मध्ये नोंद झाले बदल त्यांना नुकतेच इंडिया बुक तर्फे प्रमानपत्र व मेडल देवून सन्मानित करण्यात आले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आप्पासाहेब ढूस व गीता विखे पाटील यांची इंडिया बुक मध्ये नोंद झाल्याबद्दल क्रांतीसेनेने केला सत्कार
गिताताई विखे-कानवडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 2 एप्रिल 2020 रोजी पॅरामोटर मध्ये बसुन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व गिताताई विखे पाटील यांनी हवेत तब्बल दोन हजार फुटांवर उड्डाण घेऊन वाढदिवस साजरा केला होता.अशा प्रकारे एखाद्या महिलेने पॅरामोटर मध्ये बसुन हवेत वाढदिवस साजरा करण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरल्याने त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेऊन नोंद केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचा क्रांतीसेनेच्या वतीने सत्कार करताना गिताताई विखे पाटील यांचे काका राहुरी कारखान्याचे माजी डिस्टीलरी मॅनेजर बबनराव धोंडे,मावशी मंगला धोंडे,क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील,हर्षद धोंडे, तनुश्री धोंडे आदी…

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button