औरंगाबाद
अमरापुर वाघुंडी येथे कोव्हिड लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद

फोटो : अमरापूरवाघूंडी येथे लसीकरण करताना डॉ. गणेश शिंदे, आरोग्यसेवक उबाळे, उषा गायकवाड, संतोष सिरसाठ, आशा स्वयंसेविका सुमनबाई शहाराव व आरोग्य कर्मचारी.
विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या अमरापूरवाघूंडी या गावांत नागरिकांकडून घेतलेल्या खबरदारीमुळे कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण पॉजिटिव्ह सापडला नसुन येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या कोविड १९ लसीकरण शिबिरात नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.
गुरुवार रोजी अमरापुर वाघुंडी या गावामध्ये ग्रामस्थांच्या विनंतीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भुषण आगाज यांच्या आदेशाने ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथिल कोव्हिड लसीकरण शिबीर यशस्वीरित्या पार पडले. या लसीकरण शिबिरात एकुण १९९ लाभार्थीना लस देण्यात आली. या लासीकरणासाठी मुलानी वाडगावचे आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश पा. शिंदे, आरोग्य सहाय्यक शिवाजी थोटे, आरोग्य सेवक संतोष शिरसाठ, आरोग्य सेविका उषा गायकवाड, उबाळे व आशा कार्यकर्ती सुमन शहाराव यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी कडूबाळ डोळस, कडूबाळ चाबुकस्वार, पोलीस पाटील, रहमुद्दीन टेलर, सोमनाथ शिंदे, गोरख टेमक, आशिष काळे, भागचंद शिंदे, नवनाथ शिंदे, संजय शिंदे, मच्छिंद्र डोळस, दीपक गायकवाड, अनिल मामिलवाड, बद्री धमसपुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगतामा, बोरडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.