अहमदनगर

वरवंडी येथील गणेश मंडळांचा अत्यंत साध्या पद्धतीत श्री गणेशाला निरोप

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तालुक्यातील वरवंडी येथील गणेश मंडळाच्या श्री च्या मुर्तीचा विसर्जन अगदी साध्या पध्दतीने विसर्जन करण्यात आला. सदर कोरोना कालखंडातील गणेशोत्सव विसर्जन प्रक्रियेत आहे. कोणताही मोठा गाजावाजा न करता गणेश मंडळांनी सुध्दा अत्यंत साध्या पध्दतीत “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत श्री गणेशजींना निरोप दिला. काही भागात जनतेची गर्दी होती. पण ती सुध्दा नियंत्रीत स्वरुपातच दिसली.

कोरोना कालखंडात दुसऱ्यांदा गणेशोत्सव साजरा झाला. सन 2020 मध्ये तर एकदम नगन्य अशा स्वरुपात सार्वजनिक गणेशमुर्तींची प्रतिष्ठापणा झाली होती. त्यामुळे विसर्जनात सुध्दा गडबड दिसली नव्हती. पण यंदाच्या गणशोत्सवात “गणेश मंडळांनी” मुर्ती प्रतिष्ठापित केल्या होत्या. त्यामुळे विसर्जन होणारच होते. दुपारचे सत्र संपल्यानंतर गणेशमुर्ती एक-एक करुन विसर्जन स्थळांकडे जात होत्या. जागो-जागी लोकांनी गणेश विसर्जन भंडारा आयोजित केला होता. जनतेतील लोक सुध्दा या भंडाऱ्यातून प्रसाद प्राप्त करत होते. जनतेतील लोक गणेश मुर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी बाहेर आले होते. पण त्यांची संख्या सुध्दा अत्यंत कमीच होती. काही ठिकाणी छोटे-छोटे वाद्य वाजविले जात होते. पण ध्वनीप्रदुशन होईल एवढा आवाज मात्र नव्हता.
वरवंडी गावात अनेक ठिकाणी मुर्तीची स्थापना करण्यात आल्या होत्या. अनेक घरगुती गणेशमुर्ती त्या ठिकाणी लोकांनी विसर्जित केल्या. काही गणेश भक्तांनी आपल्या घरासमोरच रांगोळी टाकून गणरायाचं स्वागत करण्यात आला. काही भक्तांनी स्वत: नदीवर जाऊन आपल्या घरातील गणेशजींना निरोप दिला. तसेच राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या नेतृत्वात प्रशासनाची टिम काम करत होती. सायंकाळी सातच्या सुमारास गणेश मंडळाच्या श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या वतीने गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीस आभार मानले.

Related Articles

Back to top button