कृषी

महसूल विभागाकडून पिक नुकसानीचे पंचनामे सुरू…

पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना तलाठी, कृषी सहाय्यक व उपस्थित शेतकरी. (छाया : विजय चिडे, पाचोड )

पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड महसूल मंडळात येणाऱ्या मुरमा व कोळीबोडखा परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठी ,कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून मुरमा व कोळीबोडखा शिवारामध्ये महसूल विभागाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येत आहे. 

     पावसामुळे शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. कापसाच्या कैऱ्यात पाणी जाऊन हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले.  मुगाच्या  शेंगांना पुन्हा कोंब फुटले, मोसंबीला गळ लागली, उभी तुर शेतातच आडवी झाली. डाळिंब गळून पडले. यामुळे शेतकरी मोठ्याच आर्थिक संकटात सापडले आहेत. मुरमा येथिल तलाठी व सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आदीने नुकसान ग्रस्त पिकांची पाहणी करुन पंचनामा केला. पैठण तालुक्यातील पावसाने हाहाकार उडवला आहे. हाता तोंडाशी आलेले पिके पावसामुळे हातची जात आहे. यावर्षी कधी नाही ते जुन महिन्यातील मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरू आहे. त्यामुळे मृगनक्षत्र पेरणी झाल्यामुळे पिके बहारदार होती. मात्र, पावसाने या पिकांना मोठा फटका बसला आहे. काढलेल्या सोयबीनच्या ढिगाला शेंगा उगवून निघाल्या आहे. बाजरीचेही तसेच झाले आहे. तर कापसाला कैऱ्या लागलेली आहेत त्याही नासून गेलेल्या आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची दैना उडाली आहे. पावसामुळे  नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाईची मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. या अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे चालू केले आहे. यावेळी तलाठी अनुना कावळे, कृषी सहाय्यक अधिकारी यशवंत चौधरी, शेतकरी विकास डवणे, युनुस पठाण, संपत चावरे, उध्दव चावरे, संदीप गायकवाड आदींनी मुरमा व कोळीबोडखा येथे संयुक्त पंचनामा केला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button