अहमदनगर

अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी शेजुळ

श्रीरामपूर: निमगाव खैरी येथील विठ्ठल शेजुळ यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या श्रीरामपूर युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.अखिल भारतीय क्रांतीसेनेचे शिक्षक प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे,राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
     यावेळी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, निमगाव खैरी ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजीराजे शेजुळ,अरूण काळे पाटील, अरूण थोरात, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब चेडे,शिक्षक क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ माने,संदीप त्र्यंबके,जिल्हा उपाध्यक्ष अजय जनवेजा,सुनील शेजुळ,बाळासाहेब कोल्हे, संपत शेजुळ आदी उपस्थित होते.शेजुळ यांच्या निवडीबद्दल निमगाव खैरी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजीराजे शेजुळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button