महाराष्ट्र

अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कोकाटे रांजणगाव शहर अध्यक्षपदी कमलेकर

औरंगाबाद : 9 ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय क्रांतिसेनेची बैठक बजाजनगर येथे कार्यालयात घेण्यात आली.यावेळी क्रांतीकारकांना अभिवादन करुन अखिल भारतीय क्रांतीसेनेची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. क्रांतिसेनेच्या कार्यकारिणी मध्ये औरंगाबाद ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी उद्योजक संजय कोकाटे यांची तर रांजणगाव शे पू शहर अध्यक्षपदी विजय कमलेकर यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे पत्र अखिल भारतीय क्रांतिसेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी बोलताना संजय कोकाटे यांनी सांगितले की,औरंगाबाद ग्रामीण मध्ये क्रांतिसेनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील.तसेच विजय कमलेकर यांनी सांगितले की,रांजणगाव मधील सर्वसामान्य नागरिक सुविधा अभावी बेजार आहे क्रांतिसेनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यात येईल.यावेळी उपस्थित सर्वांन नितीन देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
 तसेच यावेळी वाळूज महानगर सोशल मीडिया प्रमुख म्हणून लक्ष्मण खवणे ,युवक आघाडी महानगर उपाध्यक्ष पदी सुनील हजारे,महानगर युवक आघाडी सचिव म्हणून पद्यमनाभ कुलकर्णी,रांजणगाव शहर उपाध्यक्ष पदी विष्णू नेमटे,बजाजनगर युवक आघाडी संघटक पदी विशाल राजपूत,घाणेगाव गाव अध्यक्ष पदी अविनाश काळवणे,यांची निवड करण्यात आली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मनोहर निकम पाटील,वाळूज महानगर अध्यक्ष दिनेश दूधाट, जिल्हा संघटक राजू शेरे,वाळूजमहानगर युवक आघाडी अध्यक्ष औदुंबर देवडकर,वाळूज महानगर उपाध्यक्ष दीपक गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते प्रभू साखरे,शहर अध्यक्ष प्रवीण पवार इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष मनोहर निकम यांनी केले.या कार्यक्रमाला गजानन खाडे,रंगनाथ पांचाळ, शिवाजी डोंबाळे,पवन भांबळे, सुरज सिंग,अविनाश गायकवाड, पवन बोडके,उमेश राऊत, पमा हजारे, रोहिदास हनुवटे, विनायक पाटील,सचिन दातार, गजू सदावर्ते, पवन ताटे, अनिल कुऱ्हाडे तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button